लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर येत आहे. एवढंच नव्हे तर पीडिता मॉडेल असून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले असल्याचाही प्रकार उजेडात आला आहे. पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

नुकताच, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मांतर करून महिलांना कसं फसवलं जातं हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. या पीडित मॉडेलनेही हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून प्रभावित होऊन तिने आरपीविरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत केली, असं पोलिसांनी सांगितलं.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा >> Video : “देशातील विकासकामे करायला पैसे येतात कुठून?” काँग्रेसवर हल्लाबोल करत पंतप्रधानांनी दिले थेट उत्तर

तन्वीर अख्तर लेख खान (४०) असं आरोपीचं नाव असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पीडिता २३ वर्षीय मॉडेल असून ती २०२० पासून तन्वीरच्या मॉडेलिंग एजन्सीमध्ये कामाला होती. तन्वीरने सुरुवातीला त्याची ओळख लपवली होती. परंतु, चार महिन्यांतच त्या मॉडेलला त्याचं खरं नाव माहिती पडलं. हे दोघेही काही वेळ रिलेशनशिपमध्ये होते.

आरोपीने तिला रांचीला नेले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसंच तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठीही दबाव आणला होता. तसंच, मुंबईत असताना त्याने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता, असाही आरोप पीडितेने केला आहे. वर्सोवा पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कथित बलात्कार आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, बलात्कार रांची येथे झाल्याने संबंधित प्रकरण पोलिसांनी रांचीला वर्ग केले आहे.

हेही वाचा >> मध्य प्रदेशातील खासगी शाळेत मुलींना हिजाबसारखा गणवेश? सरकारने दिले चौकशीचे आदेश

आरोपीने दावा फेटाळला

दरम्यान, तन्वीर खानने एक व्हिडीओ प्रदर्शित करत त्याच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, संबंधित मॉडेलने त्याचे नग्न फोटो त्याच्या मित्र आणि परिवारामध्ये व्हायरल केले होते. तिला काही डेटा चोरायचा होता, असा आरोप कथित आरोपीने केला आहे.