‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’चे उद्या मुंबईत आयोजन

देशातील हौशी कारप्रेमींमध्ये श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींबद्दलच्या वाढत्या जाणिवेचे प्रतिबिंब म्हणजे ही ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’ आहे.

१० ते ३० वर्षे जुन्या श्रेष्ठ दर्जाच्या मोटारींचा सहभाग

मुंबई : श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींचा सहभाग असलेली देशातील पहिली ‘टर्टल व्ॉक्स मॉडर्न क्लासिक कार रॅली’ रविवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सोफीटेल, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या ‘कार रॅली’त १९७० आणि २००० या दरम्यान उत्पादित ४० हून अधिक प्रतिष्ठित मोटारी सहभागी होतील.

ही कार रॅली ‘कार केअर’ क्षेत्रातील नामवंत ‘टर्टल व्ॉक्स’ कंपनीच्या सहकार्याने ‘ऑटो कार इंडिया’ आणि ‘शामन यंगटायमर्स’ यांनी आयोजित केली आहे. ‘कार रॅली’ वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफीटेल येथून सुरू होईल आणि कारचा हा ताफा वांद्रे-कुर्ला सी- लिंकवरून मार्गस्थ होऊन पुन्हा ‘बीकेसी’तील सोफीटेल येथे परतेल. 

रॅलीत दहा ते ३० वर्षे जुन्या श्रेष्ठ दर्जाच्या मोटारी सहभागी होतील. देशातील हौशी कारप्रेमींमध्ये श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींबद्दलच्या वाढत्या जाणिवेचे प्रतिबिंब म्हणजे ही ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’ आहे.

या ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’त वृत्तपत्र प्रकाशन व्यावसायिक विवेक गोएंका यांच्या जग्वार ई-टाईप, बीएमडब्ल्यू ई३० (या मोटारी कधीकाळी कला आणि मोटारस्पोर्ट प्रेमी जेहांगीर निकोलसन यांच्या मालकीच्या होत्या.) यांच्यासह मर्सिडीस- बेन्झ एसएस, पॉन्टिक फायरबर्ड्स आणि होंडा एनएसएक्स या मोटारीही सहभागी होतील. कार रॅलीत करोना नियमावलीचे पालन करण्यात येईल.   भारतासह जागतिक पातळीवर श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींबद्दलच्या प्रेमाने आता एका चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे या कार रॅलीचा एक भाग होताना अभिमान वाटत असल्याची भावना ‘टर्टल व्ॉक्स इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक साजन मुरली परूवगरा यांनी व्यक्त केली. तर श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारी या केवळ एक छंद नाही, तर जीवनाचा एक भाग आहेत, अशी भावना रॅलीचे क्युरेटर पर्सिअस बांद्रावाला यांनी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modern classic car rally to be held in mumbai tomorrow zws

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या