Premium

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये आधुनिक यंत्रणा; एसआयएएस, एडीएएस प्रणालीमुळे संभाव्य अपघात टळणार

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी, मध्य रेल्वेने दोन लोकलमध्ये सिग्नल लोकेशन अनाऊंसमेंट सिस्टम (एसआयएएस) आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) प्रणाली सुरू केली आहे.

Modern system in local
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये आधुनिक यंत्रणा; एसआयएएस, एडीएएस प्रणालीमुळे संभाव्य अपघात टळणार (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी, मध्य रेल्वेने दोन लोकलमध्ये सिग्नल लोकेशन अनाऊंसमेंट सिस्टम (एसआयएएस) आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) प्रणाली सुरू केली आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला प्रकल्प हळूहळू सर्व लोकल गाड्यांमध्ये अमलात आणण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरील लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टम बसवण्यात आली आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान जीपीएस, सिग्नल ठिकाणे आणि सिग्नलची संख्या यांची कल्पना देईल. ही प्रणाली मोटरमनच्या उजव्या आणि डाव्या दिशेकडील आगामी सिग्नलची माहिती देऊन सतर्क करेल. आगामी सिग्नलबाबत ३५० मीटर आणि २५० मीटर पूर्वी अशी दोनदा सूचना देण्यात येईल, असे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मोटरमनकडून सिग्नल तोडण्याच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबईत पावसाचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरनंतर?

अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) ही यंत्रणा दोन लोकलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आली आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मोटरमनच्या वर्तनावर आणि सतर्कतेवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केले आहे. एडीएएसमध्ये तीन कॅमेरे समाविष्ट आहेत. मोटरमनच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्यासाठी एक कॅमेरा, केबिनचे दृश्य टिपण्यासाठी दुसरा कॅमेरा आणि तिसरा कॅमेरा रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड उपकरणांचे, समोरचे दृश्य टिपण्यासाठी तिसरा कॅमेरा असे तीन कॅमेरे बसवण्यात येतील.

मोटरमनने जांभई दिली तरी यंत्रणा सतर्क

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून एडीएएस मोटरमनच्या स्थितीचे सतत मूल्यांकन केले जाईल. मोटरमनचे लक्ष विचलित होणे, त्याला झोप येणे किंवा तंद्री लागणे, मोबाइल फोनचा वापर करणे, अगदी मोटरमनने धूम्रपान किंवा जांभई देखील दिली तरी ते दृश्य टिपण्यास ही यंत्रणा सक्षम आहे. अशाप्रकारची किंवा याव्यतिरिक्त कोणतीही चुकीची कृती होत असल्यास एडीएएस तत्काळ मोटरमनला सतर्क करेल. ज्यामुळे मोटरमन त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित होईल.

हेही वाचा – मुंबई : शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी

लोकल ट्रेनमध्ये एसआयएलएएस आणि एडीएएस या यंत्रणा प्रवासी आणि कर्मचारी यांच्या हिताच्या आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संभाव्य धोक्यांची सूचना देऊन आणि मार्गदर्शन करुन मध्य रेल्वेवरील संभाव्य अपघात रोखण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Modern system in local for passenger safety possible accidents will be avoided due to sias adas system mumbai print news ssb

First published on: 26-09-2023 at 23:29 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा