राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (२३ फेब्रुवारी २०२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे. या अटकेनंतर आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर एक धक्कादायक आरोप केलाय. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे असं मोहित कंबोज म्हणालेत. मलिक यांनी बांगलादेशी मुलींना भारतात आणून त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा दावाही कंबोज यांनी केलाय.

मोहित कंबोज यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहेत. आम्ही अनेक मुलींची स्टिंग ऑप्रेशन्स केली असून त्यामध्ये मुलींनी नवाब मलिकांनी आपल्याला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याची कबुली दिलीय. हे पुरावे आपण लवकरच तपास यंत्रणांकडे देणार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत. कंबोज यांनी मलिक यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

मलिक यांना कुर्ल्यातील लोक आधी फार घाबरायचे. लोक या साऱ्या प्रकरणाबद्दल बोलायचा घाबरायचे. हे प्रकरण फार गंभीर असून मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग आणि देशाविरोधी कारवायांशी संबंध असल्याचा दावा कंबोज यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ नवाब मलिक यांना राजीनामा देण्यास सांगावा, अशी मागणीही कंबोज यांनी केलीय.

नक्की वाचा >> ३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

ईडीच्या चौकशीमध्ये मलिक यांचे देशाविरोधात कारवाया करणाऱ्यांशी संबंध असल्याचं उघड झालं असून त्याबद्दलचे आर्थिक व्यवहारही समोर आलेत. तपास पुढे जाईल तसा अन्य यंत्रणाही यामध्ये सहभागी होतील आणि मोठ्या गोष्टींचा उलगडा होईल असा दावा कंबोज यांनी केलाय. कंबोज यांनी मलिक यांच्यासोबत त्यांच्या जावयावरही आरोप केलेत.

मलिकांच्या जवयाचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलर्सशी संबंध असल्याचं कंबोज म्हणालेत. मलिक यांनी टाडाच्या कलमाखाली गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीकडून मालमत्ता खरेदी केली. मलिक यांनी संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेतली मात्र पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा कंबोज यांनी केलाय. देशहितापेक्षा काहीही महत्वाचे नसल्याने यावरुन राजकारण करु नये असंही कंबोज म्हणालेत.