माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा सवाल

मुंबई : देशातील महत्त्वाच्या आणि मोक्याच्या मालमत्ता काँग्रेस सरकारने कधी विकल्या नव्हत्या हे स्पष्ट करीत माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी, राष्ट्रीय चलनीकरणाचा उद्देश हा पुढील चार वर्षांत महसूल उभा करणे हा आहे की, केंद्र सरकारच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा सवाल के ला. सहा लाख कोटी उभे करण्याची ही योजना म्हणजे भव्य विक्रीमेळा आहे, अशा शब्दांत त्यांनी या  धोरणाची खिल्ली उडविली.

राष्ट्रीय चलनीकरण वाहिनीचा मुख्य उद्देश काय हे केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट के लेले नाही, असे चिदम्बरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी बांधकाममंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते.

या वेळी चिदम्बरम यांनी मोदी सरकारला २० सवाल के ले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात काही मालमत्तांचे चलनीकरण अथवा खासगीकरण करण्यात आले, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून के ला जातो. प्रत्यक्षात तोट्यातील किं वा कमी महत्त्वाच्या अशा मालमत्तांचे खासगीकरण करण्यात आले होते. यूपीए सरकारने यासाठी काही निकष निश्चिात के ले होते. तोट्यातील सरकारी उपक्र मांचा त्यात समावेश होता. रस्ते, महामार्गांचा चलनीकरणात समावेश करण्यात येणार आहे. सध्या अनेक महामार्गांचे खासगीकरण करण्यात आले आहे. मग प्रचलित धोरणाचे काय, असा सवालही चिदम्बरम यांनी के ला.

चलनीकरणात एखादी मालमत्ता ही ३० ते ५० वर्षांसाठी खासगी कं पनीकडे सोपविण्यात आली व ही मुदत संपल्यावर मालमत्ता पुन्हा सरकारकडे येईल तेव्हा तिचे मूल्य किती असेल,  असा सवालही त्यांनी के ला. बंदरे, ऊर्जा, विमानतळ, दूरसंचार या क्षेत्रांमध्ये कोणाची मक्ते दारी निर्माण होऊ नये म्हणून कोणते उपाय योजणार याचा खुलासा सरकारकडून होणे अपेक्षित असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त के ले.

सहा लोख कोटी यातून उभे करण्याची सरकारची योजना आहे. पण ही रक्कम वित्तीय तूट भरून काढण्यासाठी वापरली जाणार नाही ना, अशी शंकाही चिंदम्बरम यांनी व्यक्त केली.

मक्तेदारीचा धोका

अमेरिके त गुगल, अ‍ॅपल,  अ‍ॅमेझॉन यांच्या मक्ते दारीला वेसण घालण्याचे सुरू झालेले प्रयत्न, चीन किं वा दक्षिण कोरियानेही त्यांच्या राष्ट्रांमधील मोठ्या उद्योगांच्या विरोधात उघडलेली मोहिम या पाश्र्वाभूमीवर राष्ट्रीय चलनीकरण वाहिनी हे धोरण राबविताना सरकारने ठराविक लोकांची  मक्ते दारी होऊ नये म्हणून काही विचार के ला आहे का, असा सवाल चिदम्बरम यांनी के ला. चलनीकरणानंतर वस्तूंच्या किं मतीवर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त के ली.