scorecardresearch

नवाब मलिक यांची अंतरिम वैद्यकीय जामिनाची मागणी

मूत्रिपडाच्या आजाराने आपण त्रस्त असल्याचे आणि पायांना सूज येत असल्याचे मलिक यांनी यापूर्वीही न्यायालयाला सांगितले होते.

(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आर्थर रोड कारागृह प्रशासनाला मलिक यांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी २ मेला घेण्याचे स्पष्ट केले. 

मूत्रिपडाच्या आजाराने आपण त्रस्त असल्याचे आणि पायांना सूज येत असल्याचे मलिक यांनी यापूर्वीही न्यायालयाला सांगितले होते.मलिक यांनी गुरुवारी विशेष न्यायालयात अर्ज करून अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची मागणी केली.   त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली. 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money laundering case nawab malik seeks temporary medical bail zws