Premium

मुंबई : सायबर मदत क्रमांकामुळे ७९ लाख रुपये वाचवण्यात यश

मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत १९३० मदत क्रमांक सुरू केला आहे.

cyber help number
मुंबई : सायबर मदत क्रमांकामुळे ७९ लाख रुपये वाचवण्यात यश (image – pixabay/representational image)

मुंबई : सायबर हेल्पलाईनमुळे २४ तासांमध्ये मुंबईतील नागरिकांचे ७९ लाख ३७ हजार रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत १९३० मदत क्रमांक सुरू केला आहे. सायबर फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या तक्रारदारांनी फसवणूक झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी १९३० मदत क्रमांकावर संपर्क साधला होता.

हेही वाचा – मुंबई : अमराठी पाट्या तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

हेही वाचा – मुंबई : कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेला पोलीस निलंबित

पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मदत क्रमांकावरून तत्काळ माहिती घेऊन संबंधित बँकेकडे पाठपुरावा केला आणि रक्कम गोठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील तक्रारदारांचे ३२ लाख १६ हजार ७६८, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेतील एकूण ५ तक्रारदारांसह ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील तक्रारदारांचे दीड लाख रुपये असे एकूण ७९ लाख ३७ हजार ११६ रुपये गोठविण्यात यश आले आहे. दरम्यान, नागरिकांनीही सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money of citizens of mumbai saved due to cyber help number mumbai print news ssb

First published on: 30-11-2023 at 21:34 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा