खासदार सचिन तेंडुलकरने सुचविले मोनिकाचे नाव
विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर मोनिका मोरेची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, खासदार सचिन तेंडुलकरने मोनिकाचे नाव सुचवले आहे. रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेली मोनिका आता रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडणार आहे.
मोनिकाचे हात कृत्रीम की खरे?
शहरातील प्रत्येक खासदाराला एकेक सदस्य नामनिर्देशित करण्याची मुभा असते. त्यानुसार सचिन तेंडुलकरने रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीसाठी मोनिका मोरेचे नाव सुचविले. या सदस्यत्वामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या आणि समस्यांच्या दृष्टीने मोनिका मोरेला रेल्वे प्रशासनाला काही नवे सल्ले देता येणार आहेत.