scorecardresearch

Premium

पहाटे सहा वाजेपर्यंत सात दिवसांच्या १७ हजाराहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन; कृत्रिम तलावात पाच हजार मूर्ती विसर्जित

पर्यावरणाचा विचार करता गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावतच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते.

More than 17,000 seven-day Ganpati idols immersed, five thousand idols immersed artificial lake mumbai
पहाटे सहा वाजेपर्यंत सात दिवसांच्या १७ हजाराहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन; कृत्रिम तलावात पाच हजार मूर्ती विसर्जित (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे सातव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत संपूर्ण मुंबईत १७ हजाराहून अधिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी पाच हजार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.

Visarjan one and a half lakhs Ganapati idols Nagpur
भक्तीमय वातावरणात, गुलाल उधळत नागपुरात दीड लाखांवर गणपती मूर्तीचे विसर्जन
sound level high in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत ध्वनिपातळी किती? खंडूजीबाबा चौकात तब्बल १२९ डेसिबल, लक्ष्मी रस्त्यावर सरासरी १०१.३ डेसिबल!
ganesh murti
वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम
ganesh murti
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीवर खूण करण्याचा निर्णय रद्द; भाजपच्या विरोधानंतर महानगरपालिकेने घेतला निर्णय

यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. यंदा मुंबईमध्ये ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे.तसेच विसर्जनासाठी १९८ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. यंदा पालिकेने मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पर्यावरणाचा विचार करता गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावतच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.

हेही वाचा… राज्यात हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ

मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत एकूण १७,१८१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १५,२४३ घरगुती गणेशमूर्ती, १८६ गौरी तर १७५८ सार्वजनिक गणपतींचेही विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात ५१४७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात ४६७७ घरगुती, ७६ गौरी तर ३९४ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: More than 17000 seven day ganpati idols were immersed five thousand idols were immersed in an artificial lake in mumbai print news dvr

First published on: 26-09-2023 at 11:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×