मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.Facebook Down: जगभरातील युझर्सना तांत्रिक अडचणीचा फटका

बुधवारी सकाळी गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचण आल्याचा प्रकार ताजा असतानाच रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील युझर्सनाही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. वाचा सविस्तर..

2.इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मसूद अजहरला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज</strong>

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार असं पुन्हा एकदा खडसावून सांगितलं आहे. वाचा सविस्तर..

3.मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात पुन्हा चीनचा खोडा

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. वाचा सविस्तर..

4.करमाफीत कपात!

मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना १ जानेवारीपासून मालमत्ता कर माफ करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असला तरी या कराबरोबर महापालिका जे विविध नऊ कर आकारते ते कायमच असल्याने मुंबईकरांना मालमत्ता करमाफीचा पूर्ण आनंद लाभणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर..

5.मोबाइलवर पबजी खेळणे पडले महागात, गुजरातमध्ये 10 जणांना अटक

पबजी या गेममुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे समोर येत असतानाच गुजरातमधील राजकोट शहरात पबजी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. वाचा सविस्तर..