कौटुंबिक हिंसाचारामुळे अनेक महिलांना जीव गमवावा लागत असल्याचे केईएम रुग्णालयाने केलेल्या अभ्यासातून उघडकीस आले आहे. कौंटुबिक कारणांमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मे २०२३ मध्ये सहा हजार १९० वैद्यकीय – कायदेविषयक प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. वैद्यकीय विश्लेषणातून महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या अनेक घटना प्रकाशझोतात आल्या.

हेही वाचा >>> दापोली रिसॉर्ट प्रकरणः निलंबीत अधिकाऱ्याला ईडीकडून अटक

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

रुग्णालयामध्ये आलेल्या, आसपासच्या परिसरातून संदर्भीत केलेल्या शवविच्छेदन अहवालांमधील एक हजार ४६७ पैकी ८४० म्हणजे ५७.३ टक्के महिलांचा अनैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. हिंसाचाराला बळी पडलेल्या १८१ प्रकरणांमधील ६७ टक्के महिला विवाहित होत्या, ५३.२९ टक्के महिला अविवाहित, तर ७.४ टक्के महिला घटस्फोटित तसेच पतीपासून विभक्त झाल्या होत्या. यापैकी ५८ महिलांचा मृत्यू जळल्यामुळे झाला होता, तर २० टक्के महिला गळफास, १६ टक्के महिलांनी विषप्रशान केले होते. तीन टक्के महिला उंचावरून पडल्या होत्या, तर सहा टक्के महिलांमध्ये गंभीर स्वरुपाची मारहाण झाल्याचे दिसून येते. ३८ टक्के मृत्युंमध्ये औषधे, केमिकल्सचा वापर करण्यात आला होता, तर धूर, आग यामुळे ३५ टक्के मृत्यू ओढावले होते. २४ टक्के मृत्यू हे शस्त्राचा वापर न करता केलेल्या हल्ल्यामुळे झाल्याचे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : तडकाफडकी बंद केलेल्या बेस्टच्या बस सुरू; बेस्टच्या चार आगारातील ३६९ बसेसची पुन्हा धाव

वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे महिलांचे मृत्यू वैवाहिक आयुष्याशी निगडित समस्यांमुळे ६६.५८ टक्के महिलांचे मृत्यू झाले, घरगुती भांडणामुळे ३३.२९ टक्के, तर नातेसंबधातील ताणतणाव, अयशस्वी प्रेमप्रकरणांमुळे १५.१३ टक्के मृत्यू झाल्याचे या अभ्यासात आढळले. गळफास, उंचावरून उडी घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी हा एक दिवसापेक्षा कमी होता. ११४ पैकी ६९ प्रकरणांमध्ये पती वा जोडीदार हा त्या महिलेच्या मृत्युसाठी कारणीभूत असल्याचे आढळले. तर ३५ टक्के प्रकरणांमध्ये कुटुंबातील इतर सदस्य मृत्युसाठी कारणीभूत ठरल्याचे अहवाल नमुद करण्यात आले आहे.