मुलीची हत्या करून महिलेकडून अपहरणाचा बनाव ; काळाचौकी अपहरण प्रकरणाला नवे वळण

मुंबई : दिवसाढवळया आईला गुंगीचे औषध देऊन तीन महिन्यांच्या मुलीच्या अपहरण झाल्याची घोडपदेव येथील घटना प्रत्यक्षात मुलीच्या आईचाच बनाव असल्याचे तपासाअंती उघडकीस आले. या महिलेनेच बालिकेला पाण्याच्या टाकीत टाकून तिची हत्या केली. मुलगी झाल्यामुळे कुटुंबाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे महिलेने प्राथमिक चौकशीत सांगितले. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. सपना […]

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : दिवसाढवळया आईला गुंगीचे औषध देऊन तीन महिन्यांच्या मुलीच्या अपहरण झाल्याची घोडपदेव येथील घटना प्रत्यक्षात मुलीच्या आईचाच बनाव असल्याचे तपासाअंती उघडकीस आले. या महिलेनेच बालिकेला पाण्याच्या टाकीत टाकून तिची हत्या केली. मुलगी झाल्यामुळे कुटुंबाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे महिलेने प्राथमिक चौकशीत सांगितले. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. सपना मगदूम असे आरोपी महिलेचे नाव आहे. जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देतो असे सांगून सपना हिला बेशुद्ध करून तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा आधी नोंदवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या तीन महिन्यांच्या मुलीची सपना हिनेच हत्या केल्याचे उघडकीस आले. सपनाने दिलेल्या माहितीत तफावत आढळल्याने पोलिसांनी सखोल चोकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. घरातील पाण्याच्या टाकीत टाकून तिने मुलीची हत्या केली.  मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mother fake complaint o 3 month old kidnap arrested for killing child zws