scorecardresearch

अनाथ लेकरांना मायेची सावली

देशातील १५ अनाथालयांतील ५०० मुलांना घेऊन हा उपक्रम साजरा करण्यात आला.

अनाथ लेकरांना मायेची सावली

देशभरामध्ये मातृदिन मोठय़ा आनंदाने साजरा केला जात असताना अनाथालयातील मुले न अनुभवलेले आईचे प्रेम कसे असते याबद्दल अज्ञात आहेत. जन्मापासून अनाथालयात मोठे झालेल्या मुलांना आईच्या मातृत्वाची माहिती पुस्तके आणि चित्रपटांच्या माध्यमातून मिळते. त्यांना आईचे आईपण अनुभवता यावे यासाठी मदर्स रेसिपी या संस्थेने देशभरातील अनाथालयात वाढलेल्या मुलांना मातृ दिनाच्या दिवशी ‘आई सर्वासाठी’ हा उपक्रम आयोजित केला होता.
देशातील १५ अनाथालयांतील ५०० मुलांना घेऊन हा उपक्रम साजरा करण्यात आला. मुंबईतील वात्सल्य फाऊंडेशन, आनंद केंद्र आणि स्नेह सदन या ठिकाणी १२० मातांनी सहभाग घेतला. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये मुले आणि आई यांच्यासोबत आनंदाने रविवारचा दिवस घालविला. या मुलांना किमान एक दिवस तरी आईचे प्रेम मिळावे यासाठी देशभरातील महिलांना या उपक्रमामध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. रविवारचा दिवस या अनाथ मुलांसोबत गमतीजमती करीत तर केक कापून साजरा केला.आई म्हणजे मायेची खाण. ती मुलांवर प्रेमाची लयलूट करू शकते, त्यांना खाऊपिऊ घालते, त्यांच्यासोबत खेळते, हा सुखद अनुभव होता. या वेळी आलेल्या माता आपल्या मुलांप्रमाणे या अनाथ मुलांसोबत खेळल्या आणि मुलेही आनंदाने यात सहभागी झाली होती, अशा भावना देसाई ब्रदर्स लिमिटेड व्यवसाय मुख्य संजना देसाई यांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या