प्रत्यक्षात एव्हरेस्टची उंची ही समुद्रसपाटीपासून ५२०० मीटर आहे. ही उंची गृहीत धरली तर दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारोसारखे पर्वत एव्हरेस्टपेक्षा उंच ठरतात. किलीमांजारोची पृष्ठभागापासूनची उंची ५६०० मीटर आहे. हवाई बेटांमधील माउना किया याची समुद्रपातळीवरील उंची ही ४,२०७ मीटर असली तरी समुद्रतळापासूनची उंची ही तब्बल १०,२०० मीटर आहे.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

एखादी व्यक्ती, स्मारक जेवढे जास्त लोकप्रिय तेवढेच त्याच्याभोवतीचे वाद अधिक. जगात सर्वाधिक उंच असलेल्या एव्हरेस्टविषयीही असेच अनेक वाद आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा वाद म्हणजे त्याच्या उंचीचा. जगातला हा सर्वात तरुण पर्वत. १९ व्या शतकात पहिल्यांदा त्याची उंची मोजली गेली. साधारण ६२ वर्षांपूर्वी सव्‍‌र्हे ऑफ इंडिया या संस्थेने एव्हरेस्टची उंची मोजली. त्याआधी व नंतरही अनेक संस्थांनी एव्हरेस्टची उंची मोजण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने मोजलेल्या उंचीमध्ये फरक असल्याने वादही झाले. मात्र साधारणपणे सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने मोजलेली उंची ही अधिकृत मानली जाते. ही उंची २९,०२८ फूट म्हणजे ८,८४८ मीटर आहे. (खरे तर डोंगराची पर्वताशी तुलना करू नये; पण महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसूबाई शिखर हे ५४०० फूट आहे. महाबळेश्वरची उंची सुमारे ४५०० फूट आहे. यावरून एव्हरेस्टच्या उंचीचा अंदाज येऊ शकेल.)

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे सव्‍‌र्हे ऑफ इंडिया पुन्हा एकदा एव्हरेस्टची उंची मोजायला तयार झाले आहे. सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या संशोधकांची टीम पुढील दोन महिन्यांत एव्हरेस्टची उंची मोजणार आहेत. हे करायचे कारण म्हणजे मे, २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेला तीव्र भूकंप. या भूकंपात जमीन सरकल्याने या परिसरातील पर्वतांची उंची कमी झाल्याचा दावा जगभरातील विविध संस्थांनी केला आहे. या भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची साधारण एक मीटपर्यंत खाली आल्याचा दावा करण्यात आला आहे. उपग्रहामार्फत घेतल्या गेलेल्या मापांमधून एव्हरेस्टच्या उंचीत एक इंच फरक पडल्याचे समजते. एव्हरेस्टच्या उंचीबाबत संशोधकांनीही शंका उपस्थित केल्या आहेत. या सगळ्या शंकांना निश्चित उत्तर मिळावे यासाठी आता एव्हरेस्टची उंची मोजण्याचे काम सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने घेतले आहे. यासाठी संशोधकांचे ३० गट महिनाभर निरीक्षण घेणार असून पुढील पंधरा दिवसांत या माहितीचे विश्लेषण करण्यात येईल.

जगभरातील पर्वतांची उंची ही समुद्रसपाटीपासूनच्या त्यांच्या उंचीवर ठरवली जाते. मात्र याबाबतही वाद आहेत. समुद्रसपाटी ही भरती व ओहोटी यामधील सरासरी उंचीवर ठरवली जाते. मात्र भौगोलिक स्थान व वारे यावरूनही समुद्रपातळीत फरक पडतो. त्यातच समुद्रसपाटीपासून मुळातच उंच असलेल्या भागातील पर्वताची उंची ही अधिक ठरते. भारतातील उत्तर भाग, नेपाळ यांची उंचीच समुद्रसपाटीपासून खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एव्हरेस्टची उंची ही या सपाटीपासून ५२०० मीटर आहे. ही उंची गृहीत धरली तर दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारोसारखे पर्वत एव्हरेस्टपेक्षा उंच ठरतात. किलीमांजारोची पृष्ठभागापासूनची उंची ५६०० मीटर आहे. हवाई बेटांमधील माउना किया यांची समुद्रपातळीवरील उंची ही ४,२०७ मीटर असली तरी समुद्रतळापासूनची उंची ही तब्बल १०,२०० मीटर आहे.  भारतीय उपखंड व आशियाचा भूखंड एकमेकांवर आदळल्याने जमिनीचा काही भाग वर सरकला व त्यातूनच एव्हरेस्टची निर्मिती झाली. एव्हरेस्टची निर्मिती जगातील इतर पर्वतांच्या तुलनेत अलीकडची म्हणजे साधारण पाच कोटी वर्षांपूर्वीची आहे. इतर पर्वत हे साधारण दहा कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे विविध पर्यावरणीय घटकांमुळे इतर पर्वतांच्या तुलनेत एव्हरेस्टची झीज कमी झाली आहे. त्यातही एव्हरेस्टखालील भारतीय उपखंडाची पट्टी सतत वरच्या पट्टीखाली सरकत आहे. त्यामुळे एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचाही दावा काही संशोधक करतात. एव्हरेस्टची वाढणारी उंची व होणारी झीज यापकी कोणाचा प्रभाव अधिक आहे, हेदेखील या नव्या मोजमापावरून दिसू शकेल.

पर्वत हा आजूबाजूच्या परिसरातील हवामानावर परिणाम करत असतो तसाच हवामानाचाही पर्वतावर परिणाम होत असतो हे सर्वमान्य आहे. मात्र पर्वताच्या उंचीचा हवामानाशी संबंध असतो, असा अभ्यास सात वर्षांपूर्वी मांडण्यात आला. जगभरातील पर्वत हे बर्फ पडण्याच्या उंचीवर (स्नोलाइन) पोहोचतात. त्यामुळेच विषुववृत्ताजवळील तुलनेने उबदार प्रदेशात पर्वतांची उंची ही अधिक व दोन्ही ध्रुवांकडे जाताना कमी असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. जमिनीचे पट्टे एकमेकांवर सरकण्यामुळे पर्वताची उंची बर्फ पडण्याच्या पातळीपेक्षा जास्त झाली की, त्यावर बर्फाचे थर साठू लागतात. बर्फाच्या प्रचंड मोठय़ा लाद्या खाली घसरताना पर्वतालाही खरवडून काढतात आणि पर्वताची उंची वाढण्यापासून थांबते. या अभ्यासाबाबतही वाद असले तरी विषुववृत्ताजवळील पर्वतांची सरासरी उंची जास्त आहे, हे वास्तव आहे.

एव्हरेस्टच्या उंचीबद्दलचे वाद हे भौगोलिक संशोधकांसोबतच लाखो गिर्यारोहकांसाठीही कुतूहलाचे ठरतात. त्याचप्रमाणे हवामान शास्त्रज्ञांसाठीही एव्हरेस्ट व हिमालयाच्या पर्वतरांगा महत्त्वाच्या ठरतात. उत्तरेकडील थंड वाऱ्यांपासून भारताचे संरक्षण करत असलेल्या एव्हरेस्टवर जागतिक तापमानवाढीचाही परिणाम होतो आहे का, एव्हरेस्टच्या माथ्यावरील बर्फ वेगाने वितळते आहे का की त्यात भर पडली आहे, अशा अनेक प्रश्नांचा उलगडाही नजीकच्या काळात होणे अपेक्षित आहे.

prajakta.kasale@expressindia.com