“हा ऐतिहासिक विजय” ; खासदार कलाबेन डेलकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मताधिक्क्यानं विजय मिळवला

kalaben delkar
खासदार कलाबेन डेलकर आणि त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांची भेट घेतली

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. मोहन डेलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीयांनी भाजपावर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेनं पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.

दरम्यान खासदार कलाबेन डेलकर आणि त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. “आम्ही चांगल्या मतांनी विजयी झालो आहोत. उद्धव ठाकरे यांना धन्यवाद करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. आमचा विजय ऐतिहासिक आहे. मुख्यमंत्री लवकरच दादरा नगर हवेलीत विजयी सभा घेण्यासाठी येणार आहेत.” अशी प्रतिक्रिया कलाबेन डेलकर यांनी दिली. 

यावेळी भाजपावर निशाणा साधतांना अभिनव डेलकर म्हणाला, “आम्ही ही लढाई जिंकली आहे, माझे वडील मोहन डेलकर हे हुकूमशाहीच्या विरोधात होते. अभी तो ये शुरूआत है.”

कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार  ८३४ तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mp kalaben delkar called on shiv sena chief uddhav thackeray srk

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या