पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात सोमवारी भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या घराबाहेर मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजपा संघर्ष मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजपा कार्यकर्त्यांकडून खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. खासदार मनोज कोटक यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले नाहीत तर आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जातील असा इशारा दिला आहे.

“काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर येणारी भाषा केल्यानंतर त्यादिवशी सुद्धा सांगितले होते की भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेसला भाड्याने माणसे आणावी लागत आहेत. आज देखील आमच्या आमदारांनी ठरवले आहे की, १२ वाजेपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले नाहीत तर आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जातील. ही नौटंकी त्यांनी सुरु केलीय त्याचा शेवट आम्ही मुंबईत करु,” असा इशारा खासदार मनोट कोटक यांनी दिला आहे.

Shobha Bachhav, Congress workers sloganeering,
डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Sangli Lok Sabha candidacy Congress workers focus on Delhi decision
सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे

“काँग्रेसच्या नेत्यांची कार्यालये आणि घरे आहेत. संसदेत पंतप्रधान मोदींनी बोलल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी संसद आहे. राहुल गांधी हे संसदेत नसतात. उत्तर ऐकायला उपस्थित नसतात. संसदेत काँग्रेसच्या खासदारांना आवाज नाही आणि लोकांना वेठीस धरले जात आहे. याला भाजपा निश्चित उत्तर देईल,” अशी प्रतिक्रिया खासदार मनोज कोटक यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.