मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहेत. या कामासाठी सातत्याने महामार्गावर टप्प्याटप्प्यात वाहतूक ब्लाॅक घेतला जातो आहे. त्यानुसार आता ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान १४ टप्प्यांत वर्धा आणि नागपूर दरम्यानच्या भागातील महामार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद राहणार आहे.

वाहतूक ब्लाॅक कुठे आणि कसा

१) वर्धा येथील साखळी क्रमांक ५८.९ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

२) वर्धा येथील साखळी क्रमांक ५९.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

३) वर्धा येथील साखळी क्रमांक ६५.४ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.

४) सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३१.५ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.

५) सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

६) सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.

७) सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ४५.४ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी१ या वेळेत बंद राहील.

८) हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.

९) हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

१०) हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ९.५ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.

११) हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ९.५.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

१२) हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ९.० येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.

१३) हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ९.० येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

१४) आर्वी, वर्धा येथील साखळी क्रमांक ८४.४ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक ३ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहिल.