एसटी बस स्थानकात येणाऱ्या स्तनदा मातांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने महिलांसाठी असलेला हिरकणी कक्ष पुन्हा पुनर्जीवीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील हिरकणी कक्षाचे पुनर्जीवन करण्यात आले आहे.

प्रवासात तान्हुल्यांना स्तनपान देताना महिलांची कुचंबणा होते. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बस स्थानकात हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पहिला हिरकणी कक्ष चंद्रपूर आगारातच स्थापन केला. हा कक्ष सहज ओळखता यावा यासाठी त्याच्या बाहेरील बाजूस लहान मुलांची चित्रे लावण्यात आली. तर ठळक अक्षरांत हिरकणी कक्ष नाव देण्यात आले.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

हेही वाचा >>> मुंबईतील गारवा हळूहळू कमी होणार; किमान तापमान १५ ते २० अंशादरम्यान राहणार

त्यानंतर राज्यातील इतर आगारात असे कक्ष स्थापन करण्यात आले. महिला प्रवाशांकडून सुरुवातीला त्याला काहीसा प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही बस स्थानकांत बसण्यासाठी योग्य जागा नसणे, पंखा, खिडक्यांची दुरावस्था, अस्वछता आदीमुळे महिलानी हिरकणी कक्षाकडे पाठच फिरवली. परिणामी, हळूहळू हिरकणी कक्षाना कुलूप लागले. ही योजना जवळजवळ बसनात गुंडाळून ठेवली होती. मात्र या कक्षाचे पुनर्जीवन करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

त्यानुसार प्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील हिरकणी कक्षाचे पुनर्जीवन करण्यात आले. खिडकीला स्वच्छ पडदे, स्वच्छ, सुंदर बिछाना, पाळणा, लहान मुलांची खेळणी अशा विविध साहित्यांनी हिरकणी कक्ष सजविण्यात आला आहे. याप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख बसस्थानकांवर हिरकणी कक्षाचे नूतनीकरण करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानंतर मुंबई सेंट्रल, परळ व कुर्ला नेहरूनगर येथील हिरकणी कक्षाचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. रायगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या हिरकणी या महिलेने दुर्दम्य धाडस करून आपल्या तान्हुल्यासाठी गडाचा उभा कडा उतरून खाली आली. तिच्या या साहसाचा गौरव म्हणून या कक्षाला हिरकणी कक्ष असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मुंबईः बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ३३ लाख रुपये उकळले

एसटी बस स्थानकातील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत होते. त्यात काही बदल करण्याचा सूचना संबंधित विभागाना केल्या असून त्यानुसार नवी हिरकणी कक्ष स्तनदा मातांना उपलब्ध होणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.