मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुलुंड पूर्व परिसर आणि पूर्व दृतगती महामार्गापर्यंत एक पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुलुंड पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रतापराव गुजर मार्ग, नीलम नगरपासून पूर्व दृतगती महामार्गापर्यंत ०.७८ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दोन वर्षांत उभारण्यात येणाऱ्या या पुलासाठी १०८ कोटी २३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेने निविदाही काढली आहे.
मुलुंड पूर्वेकडून प्रतापराव गुजर मार्ग, नीलम नगरपासून पूर्व दृतगती महामार्गापर्यंत जाताना वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने ही कोंडी सोडवण्यासाठी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुलुंड पूर्व येथील नीलम नगर, प्रतापराव गुजर मार्ग, नवघर येथे सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनांना पूर्व दृतगती मार्गाकडे जाण्या – येण्यासाठी एकच मार्ग असल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने कोंडीत अडकून पडतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी ७८० मीटर लांबीचा म्हणजेच 0.७८ किलोमीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. मुलुंड पूर्वेकडून प्रतापराव गुजर मार्ग, नीलम नगरपासून पूर्व दृतगती महामार्गापर्यंत जाताना वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई महापालिका पूल विभागाकडून ही कोंडी सोडवण्यासाठी पूल उभारण्यात येणार आहे. मुलुंड पूर्वेला नीलम नगर, प्रतापराव गुजरमार्ग, नवघर येथे सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनांना पूर्व दृतगती मार्गाकडे जाण्या – येण्यासाठी एकच मार्ग असल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने कोंडीत अडकून पडतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका पूल विभागाने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पूल प्रतापराव गुजर मार्ग, नीलम नगर येथून पुढे पूर्व दृतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. मुलुंड पूर्वेकडून बाहेर पडणारा हा पूल पूर्व द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर ते ठाणे विस्तारित फ्री वेवरील उन्नत मार्गाला मुलुंड येथेच जोडला जाईल. त्यामुळे वाहनचालक मुलुंड पूर्वेकडून नवीन पुलाचा वापर करून उन्नत मार्गांवर पोहोचतील आणि मुंबईच्या दिशेने रवाना होतील. त्यामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. मुलुंड पूर्वेला उभारण्यात येणारा नवीन उड्डाणपूल फक्त दोन मार्गीकेचा आणि मुलुंडपासून फक्त पूर्व दृतगती मार्गाच्या दिशेने जाणारा असेल.
या पुलाचा फायदा मुलुंड पश्चिमेकडील वाहन चालकानाही होणार आहे. मुलुंड पश्चिमेकडून येणाऱ्या वाहन चालकांना सध्याच्या पूर्व-पश्चिम पुलाचा वापर करता येईल आणि त्यानंतर पूर्वेला उतरून नवघर, नीलम नगर मार्गे नवीन पुलाचा वापर करून मुंबईच्या दिशेने जाऊ शकणार आहेत. हा पूल दोन वर्षात उभारला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेच्या पूल विभागातील हा महत्त्वाचा पूल असून यामुळे मुलुंड पूर्वेबरोबरच पश्चिमेला राहणाऱ्याना वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याबरोबरच प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तर एलबीएसमार्गे येणाऱ्या वाहन चालकांनाही या नव्या पुलाचा वापर करता येईल असे नियोजन आहे.
असा असेल उड्डाणपूल
लांबी – ७८० मीटर
रुंदी – ६.५० मीटर
दोन लेनचा एकेरी प्रवास एकूण खर्च – १०८ कोटी २३ लाख रुपये
