scorecardresearch

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अविनाश शेटे असे त्या तरुणाचे नाव असून त्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
संग्रहित छायाचित्र

बुधवारी सकाळी मंत्रालयासमोर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. अविनाश शेटे असे त्या तरुणाचे नाव असून त्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो मूळचा अहमदनगरचा रहिवासी असल्याचे समजते. अविनाशने सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी परीक्षा दिली होती. मात्र नोकरी मिळत नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे एबीपी माझा वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

अहमदनगरमध्ये राहणारा २५ वर्षीय अविनाश शेटे बुधवारी सकाळी मंत्रालयाजवळ आला. गार्डन गेटसमोर त्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2018 at 12:01 IST

संबंधित बातम्या