मुंबई : वांद्रे येथे ट्रक अपघातात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय असरानी (४०) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून ते वांद्रे टर्नर रोड येथील रहिवासी होते.

हेही वाचा – मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम

हेही वाचा – मुंबई : रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय कारवाई केली ? तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

असरानी हे रविवारी घरी जात होते. त्यावेळी, ट्रकचालक मंजूर अन्सारी (४९) हा भरधाव वेगाने चालवत होता. त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक झाडाला जाऊन धडकला. त्यावेळी, ट्रकमधील आयताकृती लोखंडी सांगाडा असरानी यांच्या डोक्यावर पडला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी असरानी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी ट्रक चालक मंजूर अन्सारीविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.