scorecardresearch

मुंबई : व्यावसायिकांना फसविणाऱ्या तोतया सरकारी अधिकाऱ्याला दुबईत अटक

दुबईस्थित भारतीय व्यावसायिकांचे लाखो रुपये लूटणारा तोतया सरकारी अधिकारी चेतन भेंडे याला दुबई पोलिसांनी नुकतीच अटक केली.

मुंबई : व्यावसायिकांना फसविणाऱ्या तोतया सरकारी अधिकाऱ्याला दुबईत अटक
( संग्रहित छायचित्र )

दुबईस्थित भारतीय व्यावसायिकांचे लाखो रुपये लूटणारा तोतया सरकारी अधिकारी चेतन भेंडे याला दुबई पोलिसांनी नुकतीच अटक केली.व्यावसायिकांना सरकारी ओळखपत्र दाखवून त्यांच्याशी व्यवसायात भागिदारी करून कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवून चेतन लाखो रुपयांची लूट करीत होता.केंद्र सरकारच्या दूरसंचार समितीमधील सदस्य असल्याची बतावणी करून चेतन भेंडे याने नायगावमधील व्यायामशाळा व्यावसायीक भूपेश कांबळे यांच्याशी ओळख केली. राजमुद्रा असलेले ओळखपत्र दाखवून भेंडे राष्ट्रीव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडत होता. भेंडे व त्याची टोळी ओळखपत्राचा वापर करून व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत होती. व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमीष भेंडे याने कांबळे यांना दाखविले आणि त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कर्ज मिळात्च नाही. तसेच भेंडेने त्यांचे ४० लाख रुपये परतही केले नाहीत.

हेही वाचा >>> मुंबई : रिक्षा-टॅक्सी प्रवाशांच्या सवलती कागदावरच

कांबळे यांनी दुबईत फेब्रुवारी २०२२ रोजी व्यायामशाळा सुरू करण्याची योजना आखली होती. भेंडेने व्यायामशाळेसाठी कांबळे यांच्यासोबत ६० टक्के भागिदारीचा करार केला. मात्र, तोदेखील करार पूर्ण केला नाही. त्यानंतर एप्रिल २०२२ रोजी कांबळे यांना माहिती अधिकारातून भेंडे तोतया अधिकारी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे भेंडे मुंबईत आला. ऑगस्ट २०२२ मध्ये कांबळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आणि दुबई पोलिसांत गुन्हा दाखल केला. दुबई पोलिसांनी भेंडे याच्याशी संपर्क साधून त्याला हजर होण्यास सांगितले. मात्र भेंडे त्यांना कोणताही प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान, भेंडे काही कारणास्तव दुबई गेला आणि दुबई पोलिसांनी त्याला अटक केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या