मुंबईः लोअर परळ येथे पुलावर मोटरगाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोघे जण जखमी झाले असून ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

करी रोड येथील लोअर परळ पुलावर रविवारी दुपारी मोटरगाडी सेनापती बापट मार्गाच्या दिशेने जात होती. त्यावेळी मातुल्य नाका, सिग्नल चौकात उजव्या बाजूस वळण घेत असलेल्या दुचाकीला मोटरगाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात आयुष कैलाश सिंह (२०) व शिवम कमलेश सिंह (२२) व विशाल प्रेमबहादुर सिंह (२१) हे तिघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ पोलीस वाहन व रुग्णवाहिकेच्या मदतीने नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान आयुष सिंह (२०) याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात जखमी झालेले शिवम व विशाल या दोघांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान

हेही वाचा – मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान

याप्रकरणी मोटरगाडीचालक मनिष सिंह (२५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो कुर्ला येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.