मुंबईः महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) सोने तस्करीच्या संशयावरून तीन ठिकाणी छापे टाकून १९ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला डीआरआयने अटक केली.

आरोपी तस्करी करून आणलेले सोने व चांदी वितळवण्यात मदत करीत होते. या कारवाईत २३ किलो ९२० ग्रॅम सोने, ३७ किलो चांदी व पाच लाख ४० हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी कार्यरत मजूर आणि सहाय्यकांच्या जबाबानंतर प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ

हेही वाचा – Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!

जप्त केलेल्या सोन्याचा स्रोत आणि त्याबाबत आवश्यक कागदपत्र सादर करण्यात आरोपी अपयशी ठरल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामागे मोठी टोळी असल्याचा संशय आहे. त्याबाबत डीआरआय अधिक तपास करीत आहे.

Story img Loader