मुंबईत राहणाऱ्या अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडवर बलात्काराचा आरोप

मुंबईत राहणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीने पोलीस स्थानक गाठून एक्स बॉयफ्रेंडविरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार नोंदवली आहे

(प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईत राहणाऱ्या एका २६ वर्षीय मॉडेलने पोलीस स्थानक गाठून  एक्स बॉयफ्रेंड विरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार नोंदवली आहे. मॉडलिंग बरोबर ही तरुणी अभिनयाचे सुद्धा काम करते. तिचा एक्स बॉयफ्रेंड नोएडा येथे राहायला आहे. आरोपी ३४ वर्षीय मॉडेल आणि अभिनेता आहे. तक्रार नोंदवणाऱ्या तरुणीकडे त्याचा पत्ता नसल्यामुळे पोलीस कॉल डाटा रेकॉर्डवरुन त्याला शोधून चौकशीसाठी बोलवणार आहेत.

एका चित्रीकरणाच्यावेळी २०१७ साली दोघांची ओळख झाली. पीडित तरुणी मालाड येथे राहते. आरोपी तिला भेटण्यासाठी नियमित मुंबईला यायचा अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचे लग्न झाले होते. पण त्याने ते लपवून ठेवले व शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती केली. लग्न करण्याचे त्याने आश्वासन दिले होते. एकत्र असताना माझे अन्य मित्र-मैत्रिणींबरोबर असलेले संबंध त्याला मान्य नव्हते.

तो सतत मला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अन्य पुरुष मॉडेलसोबत काम करु देत नव्हता. जर त्याचे ऐकले नाही तर धमकावायचा मारहाण करायचा असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीविरोधात विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी सध्या मुंबईत नसून आम्ही त्याचा शोध घेत आहोत असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai actress alleges ex lover raped assaulted her dmp

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या