मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करत एका वकिलाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वकील सुधा द्विवेदी यांनी एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तसेच सह पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंभे आणि राज्य लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या कार्यालयात लेखी तक्रार सादर केली. या प्रकरणी फ्री प्रेस जर्नलने सविस्तर वृत्त दिलं आहे.
तक्रारीत, द्विवेदी यांनी वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे, ज्यात ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे साक्षीदार प्रभाकर सईल आणि केपी गोसावी आणि सॅम डिसोझा नावाच्या एका व्यक्तीच्या कथित खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

हेही वाचा – “…म्हणून समीर वानखेडेंवर होत आहेत आरोप”; क्रांती रेडकरने दिलं आरोपांना उत्तर

“आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे, परंतु अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही,” असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडून देण्यासाठी वानखेडे आणि इतरांसह काही एनसीबी अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा सईलने केल्याच्या एका दिवसानंतर ही तक्रार आली आहे. सईलने सांगितले होते की, तो या प्रकरणातील आणखी एका साक्षीदाराचा अंगरक्षक होता. गोसावी, जो ३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या किनारपट्टीवरील क्रूझ टर्मिनलवर NCB च्या छाप्यांनंतर फरार होता, ज्यामुळे आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी वानखेडे यांनी आपल्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत.