scorecardresearch

मुंबईतील हवा पुन्हा ‘अतिप्रदूषित’, मुंबईचे एक्यूआय ३२५ वर

दिवसेंदिवस मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ होत असल्याने मानवासह इतर सजिवांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना, या विषयावर ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Mumbai air highly polluted
मुंबईतील हवा पुन्हा 'अतिप्रदूषित', मुंबईचे एक्यूआय ३२५ वर (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : दिवसेंदिवस मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ होत असल्याने मानवासह इतर सजिवांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना, या विषयावर ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ‘प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ या स्थितीत आहे. शनिवारीही मुंबईतील एक्यूआय ३२५ वर पोहचल्याने शहर ‘अतिप्रदूषित’ स्थितीत असल्याचे ‘सफर’ या संकेतस्थळावरून स्पष्ट करण्यात आले. तर, वांद्रे – कुर्ला संकुलात प्रदूषके आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढल्याने येथील हवा ‘धोकादायक’ स्थितीत असल्याची नोंद झाली.

हेही वाचा – मुंबईत पारा घसरणार, पुढील दोन दिवस किमान तापमान कमी होण्याची शक्यता

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ॲण्ड वेदर फोरकास्टींग ॲण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावर शनिवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावल्याचे स्पष्ट करण्यात आले. वाऱ्याचा वेग मंदावल्याने आणि हवा थंड असल्याने हवेमध्ये प्रदूषके साचून राहत आहेत. त्यामुळे शनिवारी मुंबईची हवा ‘अतिप्रदूषित’ असल्याची नोंद ‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीवर झाली. तसेच, कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबूर, मालाड, नवी मुंबई येथील प्रदूषकांची संख्या वाढल्याने हवेची गुणवत्ता खालावलेली होती. या ठिकाणाचे पार्टीक्युलेट मॅटर २.५ चे प्रमाण ३०० च्या पुढे असल्याने येथील हवेची स्थिती ‘अतिप्रदूषित’ असल्याची नोंद झाली. तर, माझगाव आणि वांद्रे – कुर्ला संकुल येथील नायट्रोजन डायऑक्साइडचे (एनओ २) प्रमाण अनुक्रमे २३१ आणि २८३ नोंदवण्यात आले. हा वायू धुक्यांमध्ये मिश्रित झाल्यास दृश्यमानता कमी होते. तसेच, मानवी आरोग्यावर या वायूचे घातक परिणाम होतात.

हेही वाचा – मुंबई – हमालाचा खून करणारा आरोपी अटकेत

वांद्रे-कुर्ला संकुल ४०३ एक्यू

आयचेंबूर ३५९ एक्यूआय

अंधेरी ३३३ एक्यूआय

कुलाबा ३१९ एक्यूआय

मालाड ३१७ एक्यूआय

माझगाव ३०९ एक्यूआय

भांडूप २१५ एक्यूआय

बोरिवली २२१ एक्यूआय

वरळी १८० एक्यूआय

नवी मुंबई ३६२ एक्यूआय

मुंबई ३२५ एक्यूआय

स्त्रोत्र : ‘सफर’ या संकेतस्थळाच्या शनिवारच्या अहवालानुसार

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 23:36 IST