मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीएसएमआयए) ऑक्टोबरमध्ये विशेषत: दिवाळीच्या सुट्टीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. ‘सीएसएमआयए’वरून ऑक्टोबरमध्ये १९ हजार ८४८ देशांतर्गत आणि सात हजार २२२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली. या विमानांमधून ३१ लाखांहून अधिक प्रवाशांंनी देशांतर्गत आणि १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला.

हेही वाचा : तारीख वीस, आमदार फिक्स ….उमेदवारांच्या घोषवाक्य प्रतिभेला बहर

Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
MMRDA Contractors given extension for work on Metro 9 and Metro 7A lines Mumbai news
‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ; मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Transport Minister Pratap Sarnaik said private passenger transport providers like Ola Uber Rapido brought under one regulation
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेकांनी मुंबईतून अन्य राज्यात, तर काहींनी परदेशात जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये ४४ लाखांहून अधिक प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यात आली. सणासुदीच्या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सीएसएमआयएवर एकाच दिवशी सर्वाधिक ९३९ उड्डाणांची नोंद झाली. हा दिवस ऑक्टोबरमधील सर्वात व्यस्त दिवस होता. ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत ठिकाणांमध्ये दिल्ली, बंगळुरू आणि गोवा या ठिकाणांना सर्वांधित पसंती होती. तर, आंतरराष्ट्रीय ठिकाणांमध्ये दुबई, अबुधाबी आणि लंडनला मोठ्या संख्येने प्रवासी गेले. तसेच सीएसएमआयएवरून मध्यपूर्व, आशिया आणि युरोपीय देशांमध्ये विमान उड्डाणे झाली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवेत सर्वाधित वाटा हा मध्य पूर्वचा असून एकूण ५१ टक्के आहे. त्यानंतर आशिया दुसऱ्या क्रमांकावर असून २३ टक्के आणि युरोपचा १७ टक्के वाटा आहे, अशी माहिती सीएसएमआयएकडून देण्यात आली.

Story img Loader