मुंबई : मध्य पूर्वेतील तणावाचे पडसाद मुंबई विमानतळावरील वाहतुकीवर सहाव्या दिवशीही स्पष्ट दिसून येत आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, गुरुवार ,५ मार्च रोजी एकूण १०५ नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये ६५ आगमन आणि ४० उड्डाणांचा समावेश होता. गेल्या सहा दिवसांत एकूण ६०३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यात मुंबईत येणाऱ्या ३०१ आणि जाणाऱ्या २९३ विमानांचा समावेश आहे.

मुंबई विमानतळावरून मध्य पूर्वेतील देशांच्या दिशेने विमानांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. लंडन आणि अमेरिकेला जोडणारी विमानेही मध्य पूर्वेतील विमानतळांवरून जातात. त्यामुळे मध्य पूर्वेसोबतच पाश्चिमात्य देशांमध्ये जाणाऱ्या विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. मोठया प्रमाणात विमाने रद्द होत असल्याने काही प्रवासी विशेष आणि चार्टर फ्लाइटने मुंबईत परतत आहे. बुधवार आणि गुरुवारीही चार्टर विमानांचा उपयोग प्रवाशांनी केला आहे. मध्य पूर्वेत अडकलेल्या नागरिकांना भारतात परतण्यासाठी भारतीय हवाई कंपन्या काम करीत आहेत.

रद्द विमानांची संख्या

दिनांक——आगमन—-उड्डाण——एकूण

२८ फेब्रुवारी—–२४—-३३——५७

१ मार्च—५८—६७—१२५

२ मार्च—६१—५५—-११८

३ मार्च—५४—५३—-१०७

४ मार्च—४८—–४५—-९३

५ मार्च—-६५—-४०—-१०५

एकूण—-३०१—-२९३—–६०३