मुंबईमध्ये तीन तास ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवून ५१ पाहिजे/फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून, अन्य काही गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्याचबरोबर अवैध मद्य विक्री, अनधिकृत फेरीवाले, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी मुंबईत २४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २५ जानेवारी रोजी रात्री २ वाजेपर्यंत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. मुंबईतील पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, १४ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा / सुरक्षा, २८ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये सहभागी झाले होते. तसेच, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी व शोधसत्र स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व ‘ऑल आऊट ऑपरेशन’ प्रभावीपणे राबविण्यात आले.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
Mumbai
मुंबई : टेलिफोनच्या केबल चोरणाऱ्या आरोपींना अटक
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा – गोवर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस; मुंबईमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य

‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये मुंबई पोलिसांनी ५१ पाहिजे / फरारी आरोपींना अटक करण्यात आली. एकूण १०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपींना अटक करण्यात आली. अमली पदार्थांची खरेदी व विक्री करणाऱ्यांविरोधात ‘अमली पदार्थ विरोधी कायद्या’अंतर्गत एकूण १३९ कारवाया करण्यात आल्या. अनधिकृत शस्त्र बाळगणाऱ्या एकूण ४१ कारवाया करण्यात आल्या असून यात चाकू, तलवारी आदी शस्त्रे जप्त करण्यात आली.

मद्य विक्री, जुगार यांसारख्या अवैध धंद्यांवर ७० ठिकाणी छापे टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले. यात ५५ आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विनापरवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एकूण ४२ कारवाया करण्यात आल्या. महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १२०, १२२ व १३५ अंतर्गत संशयितरित्या वावरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ११४ कारवाया करण्यात आल्या.

हेही वाचा – “फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “मला अटक झाली तेव्हा…”


  • अनधिकृत फेरीवाल्यांवर एकूण ३३१ कारवाया करण्यात आल्या.
  • मुंबईतील एकूण २०२ ठिकाणी शोध सत्र राबविण्यात आले. यात अभिलेखावरील ९२६ आरोपी तपासण्यात आले असून यामधील ३३१ आरोपी सापडले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
  • सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १११ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यात एकूण सात हजार ४०६ दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. तर, मोटार वाहन कायद्यान्वये दोन हजार ५६८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
  • मोटार वाहन कलम कायद्यान्वये पाच वाहनचालकांवर मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
  • बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून एकूण ८४४ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखान्याची तपासणी करण्यात आली.
  • प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणे अशा एकूण ५५१ ठिकाणी तपासणी करण्यात आली.