शिवसेना आमदाराचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन : वृत्त समजल्यानंतर नितेश राणे म्हणाले, "काही महिन्यांपूर्वीच..." | Mumbai Andheri East MLA Ramesh Latke passes away due to heart attack nitesh rane and Amol Kolhe tweet scsg 91 | Loksatta

शिवसेना आमदाराचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन : वृत्त समजल्यानंतर नितेश राणे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच…”

लटकेंच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अंधेरीमधील त्यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झालीय.

शिवसेना आमदाराचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन : वृत्त समजल्यानंतर नितेश राणे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच…”
बुधवारी रात्री लटके यांना हृदयविकाराचा झटका आला (फाइल फोटो)

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं दुबईमध्ये आकस्मिक निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झालं असून ते आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला असून या वृत्तामुळे शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय. ही बातमी समोर आल्यानंतर अंधेरीमधील लटके यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झालीय. असं असतानाच दुसरीकडे राजकीय श्रेत्रातील व्यक्तींकडूनही लटके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यासहीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील ट्विटरवरुन लटके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> दुबईत शिवसेना आमदाराचं निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं, “त्यांच्या निधनामुळे…”

अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरुन लटके यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. “शिवसेनेचे अंधेरी पूर्व (मुंबई) चे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! लटके परिवार व शिवसैनिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो,” असं अमोल कोल्हेंनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलंय.

बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिलीय.

दरम्यान, लटके यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देतानाृ नितेश राणे यांनी लटके यांच्या निधनाने धक्का बसल्याचं ट्विटरवरुन म्हटलंय. “शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल ऐकून धक्का बसला. काही महिन्यांपूर्वीच आंगणेवाडीच्या जत्रेला जाताना कोकणात जाणाऱ्या विमानात त्यांची भेट झेली होती. डायएटींगच्या माध्यमातून त्यांनी वजन कमी केल्याबद्दल मी त्यांचं कौतुक केलं होतं. पक्षापलीकडे जाऊन ते एक चांगले मित्र होते. हे सारं अविश्वनीय आहे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी नोंदवलीय.

२०१४ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना पराभूत करुन लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-05-2022 at 08:01 IST
Next Story
थॅलेसेमिया रुग्णांचा भार शीव रुग्णालयावर ; एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण मुंबईबाहेरील