मुंबई नाताळमय!

नाताळ सणाच्या उत्साहामुळे अवघी मुंबापुरी गुरुवारी झगमगून गेली होती. शहरातील विविध चर्चना मनमोहक रोषणाई करण्यात आली होती तर ठिकठिकाणी ख्रिसमस ट्रीही सजविण्यात आले होते.

नाताळ सणाच्या उत्साहामुळे अवघी मुंबापुरी गुरुवारी झगमगून गेली होती. शहरातील विविध चर्चना मनमोहक रोषणाई करण्यात आली होती तर ठिकठिकाणी ख्रिसमस ट्रीही सजविण्यात आले होते. मरीन ड्राईव्ह परिसरालाही ख्रीसमसचा रंग आला होता. चर्चसोबत सुट्टीनिमित्ताने बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील मॉल्समध्येही नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील रस्त्यांवरून फिरणारा सांताक्लॉज लहानथोरांचे लक्ष वेधून घेत होता. अनेक ठिकाणी नाताळनिमित्त येथू ख्रिस्ताच्या अवताराची माहिती सांगणारे मनमोहक देखावेही केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai at festive mood of christmas

ताज्या बातम्या