मुंबई : मुंबईतून अयोध्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, मध्य रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहेत.
हेही वाचा – मुंबई : शिक्षकाकडून सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग, धार्मिक शिक्षण संस्थेत घडला प्रकार
हेही वाचा – विशेष तिकीट तपासणी : विनातिकीट प्रवास करणाऱ्या १,२७३ प्रवाशांकडून चार लाख दंड वसूल
गाडी क्रमांक ०१०१९ विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी अयोध्या येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०२० विशेष रेल्वेगाडी ३१ ऑगस्ट रोजी अयोध्या येथून रात्री ११.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर आणि लखनऊ येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २ गार्ड्स ब्रेक व्हॅन, १६ शयनयान आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. या रेल्वेगाडीचे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.