scorecardresearch

मुंबै बँक प्रकरण : प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा

अटक झाल्यास ५० हजारांच्या बंधपत्रावर सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश

(संग्रहीत छायाचित्र)

राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर प्रकरणी दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा अनेक वर्ष तपास सुरू आहे त्यामुळे अटकेची आवश्यकता नसल्याचं, उच्च न्यायालायने सांगितलं आहे. न्यायालयाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे. तर, केवळ राजकीय हेतूने प्रेरीत असा हा एफआयआर नोंदवला गेल्याचं यावरून दिसून येत आहे,असं दरेकरांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

याशिवाय, जरी तपासा दरम्यान पोलिसांनी दरेकरांना अटक केली तरी त्यांना तत्काळर ५० हजारांच्या बंधपत्रावर सुटका करण्याचे आदेशही न्यायालायने दिले आहेत.

दरम्यान, मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर ठरलेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी पुन्हा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. दरेकर यांची सोमवारी तीन तास चौकशी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने चौकशीच्या नावाखाली आपला छळ मांडला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai bank case high court releases praveen darekar from arrest msr