मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे दोन पदाधिकारी यांच्यावर बॅलार्ड पीअर येथील ३८ व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी आज (शुक्रवार) आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी दरेकर यांना पोलिसांनी अटक केली. मात्र उच्च न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची लगेच जामीनावर सुटका केली. दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र ९०५ पानांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र दरेकर हे बोगस श्रीमंत मजूर असल्याची वृत्तमालिका ‘लोकसत्ता‘ने १० ते १२ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची दखल घेत सहकार विभागाने दरेकर यांच्यावर कारवाई का करू नये, या बाबत नोटिस बजावली. या प्रकरणी दरेकर यांनी प्रतिनिधीमार्फत केलेला युक्तिवाद समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करीत मुंबई विभागाच्या सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला –

१९९७ पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. याविरुद्ध दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द व्हावा, अशी याचिका केली. ही याचिका प्रलंबित ठेवत उच्च न्यायालयाने दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. दरेकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

२९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले –

या प्रकरणी तातडीने तपास पूर्ण करून पोलिसांनी दरेकर तसेच प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे पदाधिकारी श्रीकांत कदम आणि प्रवीण मर्गज यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दरेकर यांच्यावर फसवणूक, खोटी माहिती देणे, विश्वासघात, बनावट कागदपत्रे सादर करणे आदींप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी आवश्यक ते सर्व पुरावे आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. या आरोपपत्रात २९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये काही मजूर, सहकार खात्याचे अधिकारी, बँक अधिकारी आदींचा समावेश आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हा दरेकर व अन्य दोघे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर होते.