Mumbai Best Bus Accident News: मुंबईतील कुर्ला येथे भरधाव वेगातील बेस्ट बसने आठ ते दहा वाहने आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ताज्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून ४९ लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. कुर्ल्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार दिलीप लांडे यांनी काल रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हा अपघात कशामुळे घडला? याची प्राथमिक माहिती दिली.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीप लांडे म्हणाले, कुर्ला स्थानकाहून निघालेल्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे चालक घाबरला आणि त्याने ब्रेकच्या जागी एक्सलेटरवर पाय दिला. ज्यामुळे बसचा वेग आणखी वाढला. यामुळे बस नियंत्रणाच्या बाहेर जाऊन काही वाहनांना धडकली. जखमींना सेव्हन हिल, राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहींना खासगी रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या रुग्णांना माहिती देऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1866194564895424558
सदर अपघाताची माहिती देत असताना डीसीपी झोन ५ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे म्हणाले की, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी समजले आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालकाने मद्यपान केले होते का? याबाबत प्रश्न विचारला असता गावडे म्हणाले की, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. तपासानंतर यावर माहिती देऊ.
https://twitter.com/ANI/status/1866243523315667133
या अपघातात आफरीन शाह (१९), अनम शेख (२०), कनिश कादरी (५५) आणि शिवम कश्यप (१८) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिलत आहे. हिंदुस्तान टाइम्सशी काही प्रत्यक्षदर्शींनी संवाद साधला. यापैकी झिशान अन्सारी म्हणाले की, मी रॉयल स्टीट्स दुकानाबाहेर मित्रांसमवेत उभा होतो, तेव्हा भरधाव वेगाने आलेली बस मला दिसली. बुद्धा कॉलनीत घुसण्यापूर्वी बसने अनेक वाहने आणि पदाचाऱ्यांना धडक दिली. आम्ही धावत जाऊन बस चालकाला बस मधून बाहेर काढले.
Mumbai | Maharashtra CM Devendra Fadanvis announces Rs 5 lakhs ex gratia to the kins of the deceased victims in Kurla accident and treatment of the injured will be born by BEST and BMC. https://t.co/FIHfxEgi5L
— ANI (@ANI) December 10, 2024
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. तसेच घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.