mumbai bike accident 56 year old dies after bike hits him in dahisar mumbai print news zws 70 | Loksatta

मुंबई: दुचाकीच्या धडकेने ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू ; दुचाकीस्वाराला अटक

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या विशाल गोरसिया याला पोलिसांनी अटक केली. हा

मुंबई: दुचाकीच्या धडकेने ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू ; दुचाकीस्वाराला अटक
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

मुंबईः दहिसर येथे भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५६ वर्षांच्या व्यक्तीचा  मृत्यू झाला. सलीम शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी विशाल जयंती गोरसिया या दुचाकीस्वाराला दहिसर पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात दहिसर येथील एस. व्ही रोड, परबत नगर, त्रिमूती स्टुडिओसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सलीम शेख हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह दहिसर येथील एस. व्ही रोड, लक्ष्मीबाई चाळीत राहतात.  ते स्वत चालक म्हणून काम करीत होते. सलीम हे त्रिमूर्ती स्टुडिओसमोरील मानव कल्याण केंद्राजवळून पायी चालत जात होते. यावेळी एका दुचाकीस्वाराने शेखबयांना जोरात धडक दिली होती. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.

जखमी झालेल्या सलीम यांना तातडीने जवळच्या नवनीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सलीम यांचा मुलगा इम्रान शेख याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध हलगर्पणाने दुचाकी चालवून एका पादचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या विशाल गोरसिया याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर स्थानिक न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

सलीम शेख हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह दहिसर येथील एस. व्ही रोड, लक्ष्मीबाई चाळीत राहतात. 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:35 IST
Next Story
“शिंदे गट आणि भाजपानं शेपटी…”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र