मुंबई : शहर व मुंबई महानगर क्षेत्र परिसरामध्ये पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने शहर आधुनिक व सुरक्षित होत असताना शहराचा रंग बदलण्याचे काही घटकांचे कारस्थान सुरु आहे. मतांच्या राजकारणासाठी या शहराचे ध्रुवीकरण करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप भाजपचे अमीत साटम यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

१९९९ ते २०१४ दरम्यान आघाडी सरकारच्या कार्यकाळात घाटकोपर ते वर्सोवा ही ११ किमी एकमेव मेट्रो झाली. मात्र युती सरकारच्या गेल्या ११ वर्षाच्या काळात तब्बल ३२५ किमी मेट्रो जाळे निर्माण झाले असून किनारी रस्ता व अटल सेतू प्रकल्प सुद्धा गतीने पूर्ण करण्यात आले आहेत. मुंबई आधुनिक आणि सुरक्षित होत असतानाच काही घटक या शहराचा रंग बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही पक्षांच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात सहभागी केले जात आहे. ‘शहरी नक्षलवाद’च्या माध्यमातून मतांच्या राजकारणासाठी मुंबई असुरक्षित करण्याचे षडयंत्र आहे. या विघातक घटकांना राजकीय शक्ती मिळत राहिल्यास मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल. आणि कुठलातरी खान या शहराचा महापौर होईल. मुंबईचे वैभव व सुरक्षितता कायम राखण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी साटम यांनी केली.