मुंबई : सलग दोन वेळा विजयी होऊन विधानसभेत पोहोचलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार पुन्हा एकदा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे शेलार यांच्या रुपात भाज वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात हाट्रीक साधणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे उच्चभ्रू आणि दुसरीकडे निम्न मध्यवर्गीय मतदार असलेला हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र मागील १० वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे या लढाईत भाजपचे पारडे जड मानले जात असले तरी काँग्रेसने आशिष शेलार यांच्यासमोर आसिफ झकेरियांच्या रुपात आव्हान उभे केले आहे. या लढतीत भाजपने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून १० वर्षांत वांद्रे पश्चिम परिसरात करण्यात आलेली विकास कामे मतदारांपर्यंत पोहचविण्यावर भर दिला जात आहे. तर काँग्रेसनेही आता प्रचाराला वेग दिला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>>Mahesh Sawant : “अमित ठाकरे बालिश, तो काहीही…”, महेश सावंतांची टीका; राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

विधानसभा मतदारसंघांच्या २००९ मधील पुनर्रचनेनंतर नवा वांद्रे पश्चिम मतदारसंघ तयार झाला. त्याआधी हा मतदारसंघ वांद्रे विधानसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता. तर हा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा गड मानला जात होता. लोकसभा, विधानसभा असो किवा महापालिका निवडणूक प्रत्येक निवडणुकीत येथील मतदारांनी काँग्रेसला कौल दिला होता. बाबा सिद्दीकी याच मतदारसंघातून १९९९, २००४ आणि २००९ मध्ये विजयी झाले होते. पण त्यानंतर मात्र २०१४ मध्ये आशिष शेलार यांनी बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला. २००९ मध्ये आशिष शेलार यांचा बाबा सिद्दीकी यांनी अवघ्या १ हजार ६९१ मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा शेलार यांनी २०१४ मध्ये काढला. २०१९ मध्ये बाबा सिद्दीकी यांनी निवडणूक लढवली नाही. त्यांच्याऐवजी काँग्रेसने आसिफ झकेरिया यांनी उमेदवारी दिली. मात्र झकेरिया यांचा आशिष शेलार यांनी तब्बल २६ हजार ५०७ मतांनी पराभव केला. आता याच झकेरिया यांना काँग्रेसने यंदाही उमेदवारी दिली आहे. झकेरिया यापूर्वी तीन वेळा नगरसेवक झाले होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. तर आता झकेरिया यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या प्रिया दत्त, वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य नेते मंडळीही मैदानात उतरली आहेत.

हेही वाचा >>>मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम

या मतदारसंघात भाजपचे पारडे जड वाटत असले तरी येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांचा कौल कोणाला मिळतो यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात मराठी, मुस्लिम आणि ख्रिश्नच मतदारांची संख्या मोठी आहे. काँग्रेसने झकेरिया यांच्या माध्यमातून शेलार यांना आव्हान दिले आहे. आपला जुना गड पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेस, तर काबीज केलेला गड राखण्यासाठी भाजपची निकराची लढाई सुरू आहे.

आशिष है ना…

वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजपने प्रचाराला वेग दिला आहे. येथील झोपड्या, इमारतींच्या पुनर्विकासासह वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. मागील काही वर्षांपासून शेलार यांनी या तिन्ही प्रश्नाकडे लक्ष दिले आहे. त्यातूनच येथील अनेक झोपु योजना मार्गी लागल्या आहेत, मेट्रोसह अनेक रस्ते प्रकल्प राबविले आहेत. खार पश्चिम रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. उद्यान, बाॅलीवूड थीम पार्कसारखे प्रकल्प येथे राबविले जाणार आहेत, असा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे. यासाठी भाजपने ‘आशिष है ना’ अशी टॅगलाईनही तयार केली आहे. या टॅगलाईनच्या प्रचारासंबंधीच्या अनेक जाहिराती समाजमाध्यमांवर झळकत आहेत.

Story img Loader