मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. तर निकाल १६ जानेवारीला लागणार आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी युती केली आहे. तर भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी युती केली आहे. भाजप महायुती असो किंवा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्ष असो सगळ्यांनीच जोरदार प्रचार सुरु केला आहे आणि मुंबईवर दावा सांगितला आहे. मुंबई महापालिकेचा निकाल आपण ऑलनाइन कसा बघू शकतो? हे आपण जाणून घेऊ.

मुंबई महापालिकेचा निवडणूक निकाल ऑनलाइन कसा पाहाल?

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (SEC) ही निकालांची अधिकृत माहिती देते

वेबसाईट: sec.maharashtra.gov.in Urban Local Bodies / Municipal Corporation Results Mumbai Municipal Corporation (BMC)
असे पर्याय निवडून वॉर्डनिहाय निकाल पाहता येतात.

मुंबई महापालिकेची (BMC) अधिकृत वेबसाईट

वेबसाईट: portal.mcgm.gov.in

निवडणूक काळात येथे वार्डनिहाय, उमेदवारनिहाय निकाल, मतमोजणीची आकडेवारी अपडेट केली जाते. अशा पद्धतीने निकाल पाहता येईल. एवढंच नाही तर तुम्हाला मोबाइल अॅप्सवरही निवडणूक निकाल आहे.

मोबाईल अ‍ॅप्सवर निकाल कसा बघाल?

ECI / SEC संबंधित अ‍ॅप्स

प्रमुख न्यूज चॅनल्सची अ‍ॅप्स (Live अपडेट्स)

सोशल मीडिया (पूरक स्रोत)

X (Twitter), Facebook, YouTube वर

अधिकृत निवडणूक आयोग

मोठ्या न्यूज चॅनल्स
लाईव्ह अपडेट्स देतात

२२७ जागांचा निकाल संध्याकाळपर्यंत लागणार

मुंबईतील एकूण २२७ वॉर्ड्समध्ये विविध राजकीय पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा रंगणार आहे. काही वॉर्डमध्ये मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाकडून संध्याकाळपर्यंत सर्व वॉर्ड्सचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप महायुतीने कंबर कसली आहे. तर विरोधात राज आणि उद्धव ठाकरे आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही मराठीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच महापौर आमचाच बसणार असा दावा केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडतं त्याची उत्सुकता ताणली गेली आहे. महायुतीनेही महापालिकेवर दावा सांगितला आहे.