मुंबई : मुंबईतील रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये बॉम्बची धमकी दिल्याची घटना ताजी असताना मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ई-मेल मंगळवारी महापालिका मुख्यालयाला प्राप्त झाला. केएनआर गटाकडून हे दहशतवादी कृत्य करण्यात आल्याचे ई-मेलमध्ये नमुद करण्यात आले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या इमारतीची तपासणी करण्यात आली. पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. याशिवाय चेन्नईवरून मुंबईला येणाऱ्या विमानातही बॉम्ब असल्याचा संदेश प्राप्त झाला होता.

व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून cutiekats101@beeble.com या ई-मेल आयडीवरून ई-मेल पाठवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली. संबंधित ई-मेल महापालिका आयुक्त कार्यालयालाय प्राप्त झाला होता. आम्ही तुमच्या इमारतीमध्ये शक्तीशाली बॉम्ब ठेवले आहेत. लवकरच त्यांचा स्फोट होणार असून तुमच्याकडे वेळ नाही. सर्वजण मरणार आहात. तुम्ही सर्व मृत्युला पात्र आहात. तुमचे कुटुंब तुमचे दुःख पाहण्यास पात्र आहे. केएनआर गट या स्फोटांच्या मागे आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलीस पथके आणि बॉम्बशोधक पथकांनी महापालिका मुख्यालयाच्या इमारतीची झडती घेतली. परंतु, काहीही संशयास्पद आढळले नाही.

Medical Admission Fraud, Medical Admission Fraud in Mumbai, dahisar medical admission fraud, Case Registered Against Two for Medical Admission Fraud
मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल
train services between kalyan and kasara are disrupted
एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवरा, वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवरून माती गेली वाहून
team india bus from gujarat
क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, विरोधकांची सरकारवर टीका; म्हणाले, “आमची BEST…”
Mumbai, J J Hospital going to Upgrade Patient Rooms, J J Hospital, J J Hospital Facilities for Enhanced Healthcare Services, Jamshedjee Jeejeebhoy Hospital Mumbai,
मुंबई : जे. जे. रुग्णालयातील रुग्ण कक्ष होणार अद्ययावत, पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
Rahul Gandhi, Rahul Gandhi's Lok Sabha Speech, Opposition Leader Rahul Gandhi, bjp senior leaders rebuttal Rahul Gandhi, amit shah, bjp, Rajnath singh, congress, lok sabha, vicharmanch article, loksatta article,
भ्रमाचा भोपळा फुटलाय, हे सत्य स्वीकारा…
It will be difficult for Aditya Thackeray to contest from Worli in the Lok Sabha elections print politics news
कारण राजकारण: आदित्य ठाकरेंसाठी वरळी यंदा कठीण?
CM Arvind Kejriwal
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका
Former Police Officer Julio Ribeiro, Julio Ribeiro, Plight of Muslims Under Modi Shah Government, Plight of Muslims Under Modi Shah Government in india, uneducated muslim situation in india, Julio Ribeiro Efforts with Mohalla Committees Post Mumbai Riots, Mohalla Committees Post Mumbai Riots
‘त्या’ धाडसी मुस्लीम मुलीविषयी तुम्हाला माहीत आहे का?

हेही वाचा…पत्राचाळ योजनेतील ३०६ घरांच्या किमतीत वाढ? सात ते दहा लाखांनी वाढ प्रस्तावित; विजेत्यांवरील आर्थिक भार वाढणार

cutiekats101@beeble.com याच ई-मेल आयडीवरून पवईतील हिरानंदानी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये शहरातील ५० रुग्णालयांत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. तपासणीत रुग्णालयात कोणतीही संशयित वस्तू सापडली नसून ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. याशिवाय शहरातील ४०-५० महाविद्यालयांसह संस्थेतही स्फोटके ठेवण्यात आल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत. या संपूर्ण घटनेमागे एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करीत आहे.

हेही वाचा…मुंबई : ग्रीनलाइट लेझर शस्त्रक्रियेने ७० वर्षांच्या वृद्धाला मिळाले नवजीवन!

विमानातही बॉम्बचा संदेश

चेन्नईहून मुंबईला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान बॉम्बने उडविण्याची धमकी मंगळवार, १८ जून रोजी मिळाली. इंडिगो कंपनीच्या चॅट बॉक्समध्ये बॉम्ब असल्याचा संदेश दिल्ली मुख्यालयाकडून विमानाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील टी वन नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास संदेश प्राप्त झाल्यानंतर विमान विमानतळावर उतरवण्यात आले. विमान आणि विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट ६ ई ५१४९ मध्येही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती.