scorecardresearch

मुंबई : कर्जामुळे कुर्ल्यात व्यावसायिकाची आत्महत्या

कुर्ला पश्चिम येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली.

मुंबई : कर्जामुळे कुर्ल्यात व्यावसायिकाची आत्महत्या
( संग्रहित छायचित्र )

कुर्ला पश्चिम येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली. अशोक मोहनानी (५०) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. मोहनानी यांनी काही जणांकडून कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी मोहनानीच्या मागे तगादा लावला होता. अखेर नैराश्यातून रविवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली.

हेही वाचा >>> मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका

मोहनानी यांचा कुर्ला परिसरात एक कारखाना आहे. काही दिवसापूर्वी काही व्यापाऱ्यांनी अशोक मोहनानी याचे अपहरण करून एका कार्यालयात डांबून ठेवले होते. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. तेव्हापासून ते तणावाखाली होते. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या