मुंबई : भांडुप येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा मृतदेह रविवारी सकाळी वाशी खाडी परिसरात सापडला. प्रशांत विचारे (वय ५४ ) असे या व्यावसायिकाचे नाव असून काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. रविवारी सकाळी एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मात्र बराच काळ मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे तो कुजला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपासणी केली असता शर्टाच्या खिशामध्ये पोलिसांना पॅनकार्ड मिळाले. या पॅन कार्डवरून व्यावसायिकाची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.