मुसळधार पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना फटका बसला आहे. आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे. लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचलेल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे. तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतीच्या काळात नेहमीपेक्षा जरा गर्दी कमी असली तरी ही कार्यालयहून परतण्याची वेळ असल्याने आणि त्यात लोकल सेवा रखडल्याने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

PHOTOS : मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत

वेळापत्रक कोलमडल्याने कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेचा अभाव असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुक काहीशा उशीराने पण सुरळीत सुरु आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस कोसळल्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल झाले होते. मागील चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, आज (गुरुवार) देखील ढगाळ वातावरण राहणार असून गडगडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai central railway delayed by half an hour due to heavy rain msr
First published on: 08-09-2022 at 19:20 IST