शहर आणि उपनगरात शनिवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने पुढील २४ तासांकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पश्चिम उपनगरात पडला. शहर भागात १३.७८ मिमी, पूर्व उपनगरात १८.३५ मिमी, पश्चिम उपनगरात २०.६७ मिमी पावसाची नोंद झाली. तर, दुपारी दोन वाजता भरतीची वेळ आहे. यावेळी ४.८५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.