scorecardresearch

Premium

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोस्टल रोडबाबत मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, म्हणाले जानेवारी महिन्यात…

सुधीर मुनगंटीवार यांना दि सीएसआर जर्नल चॅम्पिअन ऑफ गुज गव्हर्नन्स हा पुरस्कार देण्यात आला. तर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना सी.एस.आर जर्नल पुरस्काराने गौरवण्यात आले.

eknath shinde on coastal road
एकनाथ शिंदे काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम वेगात सुरू आहे. हा प्रकल्प या वर्षाअखेरीस नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने पालिका प्रशासनापुढे ठेवले होते. हे लक्ष्य गाठता आलं नाही. आता या कोस्टल रोडला पहिला टप्पा जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते ‘द सी.एस.आर. जर्नल एक्सीलेन्स अवॉर्ड २०२३’ सोहळ्यात बोलत होते.या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार यांना दि सीएसआर जर्नल चॅम्पिअन ऑफ गुज गव्हर्नन्स हा पुरस्कार देण्यात आला. तर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना सी.एस.आर जर्नल पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अभिनेत्री भूमी पेडणेकर, खेळाडू मिताली राज, पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांनाही गौरवण्यात आलं.

shahrukh-khan-dadasaheb-phalke-award
“मला पुन्हा…”, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर शाहरुख खानने व्यक्त केल्या मनातील भावना
Fali S Nariman
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन
satara first shivsanman award, shivsanman award declared to pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला साताऱ्यात, शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाणार
Why Dr Raghunath Mashelkar is also attracted to Godavari Gaurav award
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनाही ‘गोदावरी गौरव’चे आकर्षण का?

“आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही सर्व प्रकल्पांना गती दिली. सर्व प्रकल्प सुरू केले. मी एका प्रकल्पाबाबत सांगेन. मुंबईतल कोस्टल हायवे जानेवारीच्या शेवटी मरिन लाईन्स ते वरळी हा पहिला टप्पा खुला होणार आहे. पुढच्या वर्षी त्याच्यापुढील टप्पा सुरू होईल. एमटीएचएल शिवडी-न्हाव्हा शेवा हा लांब सागरी सेतू महिन्याभरात सुरू होणार असून अडीच तासांचा कालावधी अवघ्या १५ मिनिटांवर येणार आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >> विश्लेषण: कोस्टल रोड – राज्य सरकारच्या आग्रहामुळे पालिकेपुढे पेच…

“पहिल्या मंत्रिमंडळपासून आतापर्यंत आम्ही सर्व निर्णय सामान्य जनतेसाठी केले. आमचं हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताच सभागृहाच एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले, आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न करू.

मुंबई सागरी किनारा प्रकल्प कसा आहे?

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारी हा मार्ग तयार केला जात आहे. त्याची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत २.८ किमी लांबीचे दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ७० टक्क्यांनी वाचणार आहे. समुद्रात भराव घालणे, जमीन तयार करणे, बोगदे खणणे, समुद्रात पूल बांधणे, समुद्री भिंत, समुद्री पथ बांधणे, हिरवळ तयार करणे अशी कामे या प्रकल्पात समाविष्ट आहेत आणि ही सगळी कामे एकाच वेळी सुरू आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai coastal road when will the first phase from marine lines to worli start chief minister gave information sgk

First published on: 09-12-2023 at 23:15 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×