फ्रिज ते कपाट घरातल्या या भागांमध्ये आईच्या मृतदेहाचे तुकडे लपवले आणि..तीन महिने मुंबईत राजरोस वावरत होती मुलगी

कपाटापासून फ्रिजपर्यंत घरातल्या अनेक भागांत लपवले आईच्या मृतदेहाचे तुकडे, हत्येनंतर तीन महिने राजरोस वावरत होती मुलगी

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

आई आणि मुलगी हे नातं जगातलं सर्वात जवळचं आणि प्रेमाचं नातं समजलं जातं. मात्र याच नात्याला काळीमा फासण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईत एका मुलीने आपल्या आईची हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे घरातल्या विविध भागांमध्ये लपवले होते. मुंबईतल्या लालबाग या ठिकाणी ही घटना घडली. एवढंच नाही तर तीन महिने आपल्या आईच्या मृतदेहांच्या तुकड्यांसोबत ही मुलगी राहिली.

नेमकं काय घडलं?

मुंबईतल्या लालबाग या ठिकाणी मुलीने तिच्या आईची हत्या केली. त्यानंतर आईच्या मृतदेहाचे तुकडेही केले. हे तुकडे या मुलीने कपाटात, फ्रिजमध्ये, पाण्याच्या ड्रममध्ये ठेवले होते. मंगळवारी रात्री लालबागच्या एका घरातून तुकडे तुकडे झालेला हा मृतदेह बाहेर काढला गेला तेव्हा या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. कारण आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मुलगी त्याच घरात राहात होती. या मुलीने एक-दोन दिवस नाही तर तीन महिने या मृतदेहाच्या तुकड्यांसोबत काढले. वीणा जैन असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर रिंपल जैन असं पोलिसांनी अटक केलेल्या तरूणीचं नाव आहे.

ही घटना नेमकी कशी उघडकीस आली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रिंपलचा चुलत भाऊ तिच्या घरी पैसे देण्यासाठी गेला होता. तेव्हा वीणा जैन दिसत नसल्याने कुठं आहे, असं भावाने रिंपलला विचारलं. तर, ती कानपूरला गेल्याचं तिने म्हटलं. पण, संशय आल्याने त्याने रिंपलला दरवाजा उघडण्यास सांगितलं. जेव्हा तो घरात गेला, त्याला दुर्गंधी परसल्याचं लक्षात आलं.” त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. जेव्हा पोलिसांनी लालबागच्या या घरातून तुकडे झालेला वीणा जैन यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा शेजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की तीन महिने आपल्याला काहीच कसं कळलं नाही?

श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण

काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर नावाच्या तरूणीचीही तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली होती आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. मुंबईत अशीच घटना घडल्याने पोलिसांना आणि शेजाऱ्यांनाही श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली आहे. अत्यंत भयंकर आणि क्रूर अशी वाटणारी ही मर्डर मिस्ट्री पोलिसांनी सोडवली आहे.

पोलिसांनी झडती घेतली तेव्हा

पोलिसांना जेव्हा वीणा जैन यांच्या भावाच्या तक्रारीवरून संशय आला तेव्हा त्यांनी रिंपल जैन यांच्या घराची झडती घेतली. त्या झडतीसाठी पोलीस जेव्हा रिंपल जैन यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना गेल्या गेल्याच दुर्गंधी आली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी जेव्हा सगळा कसून तपास केला तेव्हा त्यांना घराच्या कपाटात प्लास्टिकचं एक पाकिट मिळालं. त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर दुर्गंध येत होता. हे पाकिट उघडल्यावर पोलिसांना वीणा जैन यांचं शीर मिळालं. त्यानंतर फ्रिजमध्ये, ड्रममध्ये तसंच घरातल्या विविध ठिकाणी असेच तुकडे सापडले. त्या तुकड्यांची अवस्था इतकी भयंकर झाली होती की त्याकडे पाहवतही नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. पाण्याच्या टाकीत पोलिसांना वीणा जैन यांचे हात-पाय सापडले. तर इतर तुकडे घराच्या विविध भागांमध्ये लपवण्यात आले होते.

मुलीने आईला का ठार केलं?

पोलिसांनी हे प्रेत वीणा जैन यांच्या नातेवाईकांना दाखवलं तेव्हा त्यांनी प्रेताची ओळख पटवली. यानंतर हे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सुरूवातीला पोलिसांनी रिंपलला या घटनेबाबत विचारलं तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिने असंही सांगितलं की आईचा मृत्यू आपोआप झाला. मात्र पोलिसांनी जेव्हा विचारलं की आईच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात आणि इतर ठिकाणी कसे पोहचले त्याची उत्तरं रिंपलला देता आली नाहीत. यानंतर वीणा जैन यांची मुलगी रिंपलला अटक करण्यात आली आहे. तिने हत्या का केली? कधी केली? तुकडे कसे केले? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळणं बाकी आहे. तीन महिने ती या प्रेताच्या तुकड्यांसोबत राहात होती हे देखील पोलिसांनी सांगितलं.