जे.जे.उड्डाणपूलाजवळ नशेबाजाला स्टंट भोवला, उंचावरुन पडून हात-पाय फ्रॅक्चर

क्रॉफेड मार्केट परिसरातील बाबुराव शेट्ये चौकानजीक गुरुवारी दुपारच्या १२.३० च्या सुमारास एका धक्कादायक घटना घडली.

क्रॉफेड मार्केट परिसरातील बाबुराव शेट्ये चौकानजीक गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एका धक्कादायक घटना घडली. नशेमध्ये असलेला एक इसम जे.जे. उड्डाणपूलापासून इमारतीला जोडणाऱ्या एका वायरला लटकून स्टंट दाखवत होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या काळाजाचा ठोका चुकला.

त्यांनी वायरला लटकलेल्या जावेद अश्रफ अली (३८)  सावध करण्याचा प्रयत्न केला. पण तो खाली पडला.  इमारतीच्या दुसऱ्या ते तिसऱ्या मजल्याच्या उंचीपर्यंत ही वायर बांधण्यात आली होती. त्याला तात्काळ नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतक्या उंचावरुन पडल्यामुळे त्याचे दोन्ही पाय आणि उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे.

जावेद स्वत:चा या वायरला जाऊन लटकला व त्याने आपला जीव धोक्यात घातला असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. जावेद नशेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai crawford market drunked man hold wire