मुंबई: मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने या सामन्यांसाठी मुंबई पोलिसांनी पुरविलेल्या बंदोबस्ताचे १४ कोटी ८५ लाख रूपये थकविल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मुंबई पोलिसांनी पाठविलेल्या ३५ स्मरणपत्रांनाही मुंबई क्रिकेट असोसिएशनने केराची टोपली दाखवली आहे. तरही यंदाच्या आयपीएल सामान्यांसाठी पोलिसानी बंदोबस्त पुरवला आहे.

मुंबईच्या वानखेडे किंवा ब्रेवॉर्न मैदानावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केले जाते. या सामन्यांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून सशुल्क बंदोबस्त पुरविण्यात येतो. मात्र या बंदोबस्तापोटीचे मुंबई पोलिसांचे १४ कोटी ८२ लाख रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकविल्याची आण् थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
Mumbai Ranji cricketers get same match fee from MCA as BCCI
मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी! ‘एमसीए’कडून ‘बीसीसीआय’इतकेच सामन्याचे मानधन
Cricket bookies in Mumbai Delhi active in Nagpur for IPL cricket tournament crores betting
कोट्यवधींची उलाढाल! ‘आयपीएल’साठी क्रिकेट सट्टेबाज सक्रिय

पोलिसांनी गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, आठ सामन्यांना पुरविलेल्या बंदोबस्ताचे शुल्क थकवण्यात आले आहे. सन २०१३ मध्ये झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, सन २०१६मधील टी २० विश्वचषक आणि कसोटी सामने, सन २०१७ आणि २०१८मधील आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे मिळून १४ कोटी ८२ लाख ७४ हजार रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. या थकबाकी वसुलीसाठी पोलिसांनी आतापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे.

एक वर्षांची शुल्कनिश्चिती प्रलंबित

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यांसाठी घेतलेल्या बंदोबस्ताचे शुल्क अद्याप आकारले गेले नाही. या सामन्यांसाठी किती शुल्क आकारावे याबाबतचे आदेश राज्य सरकारने अद्याप दिलेले नाहीत. त्याबाबतही गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना नऊ वेळा स्मरणपत्रे पाठविल्याचे पोलिसांनी गलगली यांना दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.