पत्नीचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याच्या प्रकरणात मुंबईतल्या एका रेल्वे इंजिनिअरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यानंतर पत्नीवर सूड उगवण्यासाठी तिचे आक्षेपार्ह फोटो या रेल्वे इंजिनिअरने सोशल मीडियावर पोस्ट केले. या प्रकरणात आता या प्रकरणी या रेल्वे इंजिनिअरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
ज्या महिलेचे फोटो पोस्ट करण्यात आले ती महिला मुळची राजस्थानची आहे. ती सध्या मालाड या ठिकाणी राहते आहे आणि UPSC परीक्षेची तयारी करते आहे. तिचा नवरा सिनियर सेक्शन इंजिनिअर म्हणून पश्चिम रेल्वेत कार्यरत आहे. त्याचं ऑफिस वांद्रे पूर्व भागात असलेल्या खार रोड या ठिकाणी आहे. २५ नोव्हेंबर २०२० ला या दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर या दोघांनीही गोरेगाव या ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. यानंतर या दोघांचे खटके उडू लागले त्यामुळे दोघं वेगळे राहू लागले. पतीकडे पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड होता. त्याने तिचे प्रोफाईलचे तपशील बदलले आणि तिच्या मित्रांशी तिच्या नावाने चॅट करु लागला. तिने या प्रकारावर आक्षेप घेतला तेव्हा तुझी बदनामी करेन अशी धमकी त्याने तिला दिली होती. free press journal ने हे वृत्त दिलं आहे.
पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने पतीने फोटो केले पोस्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीच्या या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या पत्नीने वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. १५ जानेवारी २०२६ ला हा अर्ज तिने केला होता. ज्यानंतर या रेल्वे इंजिनिअरने इन्स्टाग्रामवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली असा आरोप सदर महिलेने केला आहे. तसंच मी तुला आयुष्यातून उठवेन आणि ठार मारुन टाकेन अशी धमकीही या रेल्वे इंजिनिअरने त्याच्या पत्नीला दिली. १८ मार्च २०२६ या दिवशीही या रेल्वे इंजिनिअरने पत्नीचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. One Time View असं कॅप्शनही या फोटोंना दिलं. त्यानंतर हे फोटो डिलिट केले. मात्र हे फोटो कुठले होते तो डेटा त्याच्या पत्नीने मिळवला. त्यानंतर त्याने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी या प्रकरणी त्या रेल्वे इंजिनिअरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी रेल्वे इंजिनिअरच्या विरोधात FIR दाखल केली आहे. २१ मार्च ला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ (२), ३५२ आणि ३५६ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
